130 रूग्णांची कोरोनावर मात, नविन रुग्णांनी गाठली शंभरी

गोंदिया २७ (जिमाका) आज गोंदिया जिल्ह्यात नव्याने 100 कोरोना बाधित रुग्ण आढळले असुन गोंदिया जिल्हात रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-52, तिरोडा तालुका-04, गोरेगाव तालुका-06,आमगाव तालुका-17, सालेकसा तालुका-06, देवरी तालुका-02, सडक/अर्जुनी तालुका-04, अर्जुनी/मोरगाव तालुका-09 रुग्ण आढळून आले.

आजपर्यंत तालुकानिहाय आढळलेले बाधित रुग्ण पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-5407, तिरोडा तालुका-1128, गोरेगाव तालका-388,आमगाव तालुका-663, सालेकसा तालुका-397, देवरी तालुका-447, सडक/अर्जुनी तालुका-405,अर्जुनी/मोरगाव तालुका-500 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-107 रुग्ण आहे.असे एकूण 9442 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share