आ. कोरोटे यांच्या उपस्थितीत गोंडवाना गोंड समाज संगठनाची सभा संपन्न

तालुका प्रतिनिधी

स.अर्जुनी 24: गोंडवाना गोंड़ समाज संघटन व तिरुमाल सहसराम कोरोटे आमदार आमगांव/देवरी विधानसभा यांची संयुक्त सहविचार सभा रामरामे भवन शेन्डा येथे घेण्यात आली.
सर्वप्रथम संघटन कडून आमदार सहसराम कोरोटे यांचे गोंडवाना गोंड़ समाज संघटन चे जिल्हाध्यक्ष भरतभाऊ मड़ावी,जगदीप खंडाते क्षेत्रअध्यक्ष,आनंद इलपाते कोषाध्यक्ष, छायाताई टेकाम महिला तालुका अध्यक्ष,वसंत मड़ावी ग्रामध्यक्ष,किशोर उइके रेंगेपार,संतोष मंडारी संघटक,विजय प्रधान,छत्रपाल परतेकि, मित्तल धर्मशाहरे,यशवंत सलामे,देवचंद टेकाम,लेखलाल टेकाम तालुकाध्यक्ष,बबलू सलामे,राजेश मंडारी, अविनाश मड़ावी,शांताबाई मड़ावी,,विनोद पांढरे,श्यामराव चुटे, शंकर खोटेले,गणेश वट्टी, व समस्त सगा बांधव यांचे उपस्थित शाल व श्रीफल देवून सत्कार करण्यात आले.
यात सामाजिक/शैक्षणिक व इतर विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

6 जून 2017 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर चर्चा करुण सरळ सेवा भरतीने खऱ्या आदिवासीच्या रिक्त जागा भरण्यात यावे. 100%बिंदु नामावलीनुसार आदिवासींची नियुक्ति करण्यात यावी. DBT योजना त्वरित रद्द करण्यात यावी. या विषयावर चर्चा करण्यात आली .

Print Friendly, PDF & Email
Share