राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार-२०२० या पुरस्कारासाठी डॉ. सुजित टेटे यांची निवड

(भुपेंद्र मस्के विशेष प्रतिनिधी)

गोंदिया २४ :देवरी तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरीचे प्राचार्य डॉ. सुजित हंसराज टेटे यांची निवड दिव्या फाऊंडेशनच्या “राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार-२०२०” या पुरस्कारासाठी सन्मानित निवड करण्यात आली.

डॉ. सुजित टेटे हे विविध शैक्षणिक प्रयोग व उपक्रमाद्वारे आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व त्यांच्या भावी आयुष्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. तसेच काळानुरूप तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल करत आहेत. शिक्षण क्षेत्रात करत असलेले अविरत परिश्रम, महत्वपूर्ण बदल व देत असलेले योगदान यामुळे दिव्या फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बुलढाणा या संस्थेसाठी डॉ.सुजित टेटे हे आदर्श ठरले आहेत. म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञात व प्रेम व्यक्त करण्यासाठी दिव्या फाऊंडेशनतर्फे सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन डॉ.सुजित टेटे यांना “राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार- २०२०” साठी २२ नोव्हेंबरला सामाजिक न्याय भवन पुणे येथे सन्मानित करण्यात येणार आहे.

डॉ.सुजित टेटे हे उच्चशिक्षित असुन त्यानी इंग्रजी विषयात स्नातकेत्तर पदवी व शिक्षणशास्त्राची पदवी घेतली असुन पीएच.डी. व डी लिट ने सन्मानित आहेत.त्याचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिक व वृत्तपत्रात त्याचे प्रंबध प्रकाशित आहेत. अनेक लेख व कविता वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या असुन अनेक सेवाभावी संस्थेचे ते मानद सदस्य आहेत. काव्य लहरी, मॉरल स्टोरी, माझे माझ्याशीच स्पर्धा ह्या पुस्तकांचे ते लेखक आहेत. डिटेरमिसन , नोटबूक व परिवर्तन हे लघुचित्रपटाचे ते निर्माते आहेत. तसेच ते शोध पत्रकारिता असुन प्रहार टाईम्स हा त्यांचा स्वतंत्र ब्लाग आहे.

डॉ. सुजित टेटे यांच्या या सन्मानाबाबद त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share