सचिदानंद रियालिटीस ग्रुप नागपुर तर्फे राष्ट्रीय कवि सुदर्शन लांडेकर यांचा सत्कार……

देवरी 22-
सच्चिदानंद रियालिटीस कंपनी नागपूर यांचेमार्फत देवरी येथील स्थानिक आफताब मंगल कार्यालय कार्यक्रम संपन्न झाला, कार्यक्रमात प्रॉपर्टी किंवा प्लाट कसे घ्यावे त्याला मान्यता कशी घ्यावी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक असतात, प्रॉपर्टी घेण्याकरिता कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात जेणेकरून आपली फसवणूक होऊ नये इत्यादी सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आली.,
त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर नाव उंचावणारे,  देवरी  तालुका आणि गोंदिया  जिल्ह्याचे नाव लौकिक करणारे कवी श्री सुदर्शन लांडेकर यांच्या सत्कार शाल व श्रीफळ देऊन सचिदानंद कंपनीच्या वतीने करण्यात आला,
प्रॉपर्टी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन उमराव तांडेकर नागपूर सोबत त्यांचे सहकारी श्री महादेवराव खैरे
शिरीस तालेवार, बादल दुर्गे, यांनीसुद्धा आवश्यक माहिती दिली, कवी सुदर्शन लांडेकर यांनी आपल्या कवितेचे प्रकाशन करून समाजापर्यंत पोहोचवावे असे मनोगत व्यक्त केले, कोरोना काळातील सर्व नियम धरून आवश्यक खबरदारी घेऊनच कार्यक्रम पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संतोष तुरकर व सुरेश ताडेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Print Friendly, PDF & Email
Share