आज जिल्ह्यात 663 रुग्ण कोरोनामुक्त

गोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 19 एप्रिल रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात आज कोरोनामुळे 21 रुग्णांचा मृत्यू तर 520 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 663 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. 13 रुग्ण गोंदिया तालुक्यातील,03 आमगांव तालुक्यातील तर सडक अर्जुनी व तिरोडा तालुक्यातील प्रत्येकी दोन दोन रुग्ण आणि देवरी येथील 1 रुग्ण असे 21 रुग्नांचा शासकिय वैद्यकिय महाविदयालय गोंदिया व वेगवेगळ्या कोविड सेंटर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.


आजपर्यंत 26160 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 19299 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 6495 आहे. 5191 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 366 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 73.77 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.1 टक्के आहे तर डब्लिंग रेट 22.54 दिवस आहे. जिल्ह्यात आज 520 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया-317, तिरोडा-83, गोरेगाव-03,आमगाव-27, सालेकसा-09, देवरी-03, सडक अर्जुनी-07, अर्जुनी मोरगाव-69 व इतर राज्य/जिल्हा-02 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील 663 रूग्णांनी आज कोरोनावर मात केली. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया-410, तिरोडा-104, गोरेगाव-33, आमगाव-37, सालेकसा-19, देवरी-06, सडक अर्जुनी-42, अर्जुनी मोरगाव-03 व इतर राज्य/जिल्हा-09 रुग्णांचा समावेश आहे.



कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. त्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर किंवा गृह विलगीकरणात गेल्यानंतर या रूग्णांमध्ये नकारात्मक विचार येतात. त्यांचे विचार सकारात्मक करण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9823254520, 9765090777, 9326811266, 8788297527 आणि 9823238057यावर रूग्णांनी संपर्क साधावा. रुग्णांच्या सुविधेसाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल एसएमएसद्वारे कळविण्यात येतो.

Print Friendly, PDF & Email
Share