चिचगड ग्रामीण रुग्णालयाला रिक्त पदाचे ग्रहण

देवरी/ चिचगड: १७

तालुक्यातील चिचगड हे गाव नक्षलग्रस्त गाव म ओळख असले तरी कृषीक्षेत्रात अग्रेसर असलेल्या चिचगड येथे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सोयीसुविधा अपुऱ्या पडत आहेत. अपुऱ्या सोयींसुविधा मुळे चिचगड येथे ग्रामीण क्षेत्रातुन येनार्या रुग्णानां उपचाराविना परतावे लागत आहे. त्याशिवाय अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. यामुळे येथील रुग्णांचे आरोग्य व्हेंटिलेटरवर आहे. या रुग्नालयातील रिक्त पदे तातडीने भरली जावीत, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

अनेक वर्षांपूर्वी त्यावेळेच्या लोकसंख्येचा विचार करून चिचगड येथे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले आहे. तिथे पुरुष व महिला यांच्यासाठी वेगवेगळे कक्ष आहेत. मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, हे रुग्णालय अपुरे पडत आहे. चिचगड ग्रामपंचायत हद्दीत अनेक गावे येत असल्याने या क्षेत्राची लोकसंख्या कागदोपत्री हजारोच्या आसपास असले आता हे रुग्णालय शंभर खाटांचे करावे, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

चिचगड हे त्या क्षेत्रातील ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने मोहांडी,ककोडी , केशोरी, अबोंरा, आलेवाडा,परसोडी , कवलेवाडा, सिंदीबीरी या परिसरातील अनेक गावांतून दररोज रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात दररोज १०० ते २०० च्या आसपास रुग्ण येत असतात.

गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकिय अधिकारी डॉ भोंगाडे हे येथे कार्यरत असुन त्यांना आता अतिरिक्त कामे सांभाळावे लागत आहे एकमेव अनुभवी डॉक्टर असल्याने त्यांना रात्रंदिवस या रुग्णालयात काम करावे लागत आहे.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे कर्मचारी वर्गाची व सोई-सुविधाचीं गरज आहे त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
चिचगड ग्रामीण रुग्णालयात संपुर्ण २६ पदे मंजुर असुन फक्त १६ पदे भरलेली आहेत व १० पदे अनेक वर्षापासुन रिक्त असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. परिणामी, गावातलच महागड्या खासगी रुग्णालयात नाइलाजाने जावे लागते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही आरोग्य खात्याकडून दुर्लक्ष होत आहे.
रिक्त पदे-

वैद्यकिय अधीक्षक,वर्ग -१ , १-रिक्त
सहाय्यक अधिक्षक , वर्ग-३, १-रिक्त
कनिष्ट लिपीक , वर्ग-३, २-रिक्त
अधिपरिचारीक , वर्ग -३ , ३-रिक्त
प्रयोग साळा सहाय्यक, वर्ग-३ १-रिक्त
क्ष-किरन तंत्रद्न,वर्ग -३, १-रिक्त
शिपाई वर्ग-४
१-रिक्त

“चिचगड येथील रुग्णालयात रुग्णाची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे या रुग्णालयात कर्मचार्याचीं उरवरीत पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असी मागणी मी केलेली आहे.”
डॉ.भोंगाडे (वैद्यकिय अधिकारी चिचगड)

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •