देवरी शहरांमध्ये आज लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद

डॉ. सुजित टेटे

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या मिनी लॉकडाऊन आणि संचारबंदी ला देवरीवासियांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. देवरी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले दुर्गा चौक , मार्केट रोड, चिचगड रोड, अग्रसेन चौक , कारगिल चौक आदी परिसरात नीरव शांतता निर्माण झाली आहे. अधूनमधून काही मोटारसायकलस्वार, चारचाकी वाहने मात्र शहरात फिरत असल्याचे दिसत होते. औषध दुकाने मात्र सुरू होती.

देवरी शहरातील मुख्य ठिकाणी सर्वत्र शुकशुकाट आहे. शहरामध्ये सर्वत्र पोलीस बंदोबस्त असून. देवरीवासियांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. गजबजणारे शहर आणि परिसरात एकदम शांतता निर्माण झाली. निर्मनुष्य रस्ते, नीरव शांतता यामुळे गतवर्षीच्या लॉकडाऊनची आठवण झाली.

राष्ट्रीय महामार्गावर सुरळीत वाहतूक सुरु असल्याचे दिसून आले परंतु शहरातील लोक लॉकडाउन ला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले .
पोलीस आणि नगरपंचायत पथके रस्त्यावर उतरली.शहरातील सर्व रस्ते रिकामे निर्मनुष्य झाले आहेत. शहरातील वर्दळ शांत होऊन रस्ते ओस पडले दिसून आले .

Print Friendly, PDF & Email
Share