आजाराला कंटाळुन युवकाने केली आत्महत्या

देवरी 9: शहरातील परसटोला येथील आतीश प्रल्हाद मडावी (वय २४) यांने आपल्या पोटातील असह्य त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्टी सोडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.दोन दिवसाच्या शोधानंतर सदर युवकाचा मृतदेह परसटोला नजीकच्या तवाता आढळून आल्याची माहिती आज 9 एप्रिल रोजी पोलिसांनी दिली.घरुन मुलगा निघाल्यांतर कुटूबियांनी शोधाशोध करीत पोलीस स्टेशन देवरी येथे तक्रार नोंदवली होती.युवकाने लिहिलेल्या चिठ्टीच्या आधारे तलावात तपास कार्य करण्यात आले असता आतिशचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.

Print Friendly, PDF & Email
Share