शैक्षणिक व सामाजिक प्रयोगाचा अवलिया व्यक्तीमत्व डॉ. प्राचार्य सुजित टेटे

प्रहार टाईम्स|व्यक्ति विशेष |भुपेंद्र मस्के

“काहीच मानसांना स्मरतात लोक इथले
जे मातीसाठी झटले ते देव झाले इथले”

सदैव डोळ्यासमोर समाज, शिक्षण, आरोग्य व नागरिकांचे हक्क, स्वांतत्र्य इंत्थभुत बाबींवर झटणारी व्यक्तीच या समाजात मोठी झाली. व आपण त्यांना देवत्व बहाल केले. असे काही मोजकेच लोक असतात जे मानसांच्या गर्दीत ऊठुन दिसतात.
असेच एक सदाबहार व्यक्तिमत्व डॉ.प्राचार्य सुजित टेटे.

डॉक्टरांच्या आणि माझ्या सहवासात मी त्यांना जेवढे ओळखले त्याहीपुढे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू असतीलही पण एक निखळ गोष्ट अल्प कालावधीतच जाणवली ते म्हणजे त्यांचे “माणुसपण”.

ग्रामिण भागातुन भयावह परिस्थितीचे चटके खात ते उच्चशिक्षित झाले.डॉ. सुजित टेटे हे विविध शैक्षणिक प्रयोग व उपक्रमाद्वारे आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व त्यांच्या भावी आयुष्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. तसेच काळानुरूप तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल करत आहेत. शिक्षण क्षेत्रात करत असलेले अविरत परिश्रम, महत्वपूर्ण बदल व देत असलेले योगदान हे त्यांच्या शिक्षकी पेशासाठी डॉ.सुजित टेटे हे समाजात अल्पावधितच आदर्श ठरले आहेत.

डॉ.सुजित टेटे हे उच्चशिक्षित असुन त्यानी इंग्रजी विषयात स्नातकेत्तर पदवी व शिक्षणशास्त्राची पदवी घेतली असुन पीएच.डी. व डी लिट ने सन्मानित आहेत.त्याचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिक व वृत्तपत्रात त्याचे प्रबंध प्रकाशित आहेत. अनेक लेख व कविता वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या असुन अनेक सेवाभावी संस्थेचे ते मानद सदस्य आहेत. काव्य लहरी, माॅरल स्टोरी, माझे माझ्याशीच स्पर्धा ह्या पुस्तकांचे ते लेखक आहेत. Determinetion of struggle व Notebook हे लघुचित्रपटाचे ते निर्माते आहेत. तसेच ते शोध पत्रकारिता असुन प्रहार टाईम्स हा त्यांचा स्वतंत्र ब्लाग आहे. अलिकडेच त्यांना दे ब्लाॅसम पब्लिक स्कूल देवरीचे प्राचार्य डॉ. सुजित हंसराज टेटे यांची निवड दिव्या फाऊंडेशनच्या “राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार-२०२०” या पुरस्कारासाठी सन्मानित निवड करण्यात आली.

डॉ. प्राचार्य सुजित टेटे यांच्या आज जन्मदिन त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असले तरी त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो व दिर्घायुष्य लाभुन यशाची अगणित शिखरे पादाक्रांत करावेत. एवढेच…!

Print Friendly, PDF & Email
Share