पाच अवैद्य जुगार खेळणाऱ्यांवर देवरी पोलिसांची कारवाई

प्रहार टाईम्स

देवरी ३१: विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक सा. गोंदिया यांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने दि. ३०/०३/२०२१ रोजी रेवचंद सिंगनजुडे, ठाणेदार पोलीस स्टेशन देवरी हे आपले पो.स्टॉपसह देवरी पो.स्टे. हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की, ग्राम डवकी येथे काही इसम सार्वजनीक ठिकाणी ५२ तास पत्तीचा हार जीतचा खेळ खेळत असल्याची गोपनिय माहीती मिळाल्याने सदर ठीकाणी पो.स्टॉपसह साफळा रचुन काही इसम खेळ खेळतांना, ५२ तास पत्ती किमती १० रु. फळावर नगदी ४०२०/- रु. असा एकुण ४०३०/- रु. माल रंगेहात मिळुन आल्याने १) फुलीचंद मोहन चव्हान वय ५२ वर्ष,२) प्रेमलाल बाबुलाल मनगटे वय ५० वर्ष. ३) मोरेश्वर यशवंत घासले वय ४० वर्ष. ४) दिपक सुरज फरदे वय २८ वर्ष. सर्व रा. डवकी ५) पांडुरंग जैराम चुटे वय ६५ वर्ष. रा. शिलापुर यांचे यांचेविरुध्द पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्र. ७९/२०२१ कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना. उईके हे करित आहेत.

सदरची कारवाई विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया, जालधर नालकुल,उपविभागीय पोलीस अधिकारी आमगांव, अति.कार्य, देवरी यांचे मार्गदर्शनात पोनि. रेवचंद सिंगनजुडे पोउपनि. उरकुडे, पोना.. उईके, पोना बोहरे, पोशि. भांडारकर, पोशि. बोपचे, पोशि. चव्हाण यांनी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share