अवैध धंदे करणारे देवरी पोलीसांच्या रडारवर, देवरी पोलीसांची वॉशआउट मोहीम

आठ अवैद्य दारु विक्रेत्यावर कारवाई

देवरी ३०: विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने दि. २७/०३/२०२१ रोजी रेवचंद सिंगनजुडे, ठाणेदार पोलीस स्टेशन देवरी हे आपले पो.स्टॉपसह देवरी पो.स्टे. हद्दीत होळीच्या अनुषंगाने विशेष मोहीत राबवितांना मुखबिर कडुन गोपनिय माहीती मिळाली की, मौजा लोहारा येथील नामे सुरेंद्र देवेंद्रसिंग देसाई रा. सुरतोली हे आपल्या पानटेल्यात अवैध दारु विक्री करीत असल्याचा सशंय आल्याने पानठेल्याची झडती घेतली असता, त्यांच्या पानटपरीच्या खरड्याच्या खोक्यात ४० नग देशी दारुचे १८० मिली. भरलेले प्रत्येकी किमत ५२/-रु. प्रमाणे एकुण २०८०/रु. चा माल अवैधरित्या मिळुन आल्याने आरोपी सुरेंद्र देवेंद्रसिंग देसाई वय ४८ वर्ष, रा. सुरतोली ता. देवरी, यांचेविरुध्द पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्र. ७६/२०२१ कलम ६५(ई), ७७(अ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच प्रमोद बिरसिंग परिहार वय ४८ वर्ष. रा. सुरतोली, ता. देवरी जि.गोंदिया हा आपले लोहारा येथील पानटपरीत अवैद्य दारु विक्री करतो अशा माहीतीवरुन त्यांचे पानटपरीची दारु बाबत झडती घेतली असता, पैशाचे गल्ल्याजवळ एका पांढ-या रंगाचे थैलीत १७ नग देशी दारुचे १८० मिली. भरलेले प्रत्येकी किमत ५२/-रु. प्रमाणे एकुण ८८४/- रु. चा माल अवैधरित्या मिळुन आल्याने आरोपी प्रमोद बिरसिंग परिहार वय ४८ वर्ष. रा. सुरतोली, ता. देवरी जि.गोंदिया यांचेविरुध्द पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्र. ७७/२०२१ कलम ६५(ई), ७७(अ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच हरेंद्र हिरामन बन्सोड वय ४२ वर्ष रा. मसरामटोला, ता. सडक अर्जुनी हा पानटपरीत अवैद्य दारु विक्री करतो अशा माहीतीवरुन त्यांचे पानटपरीची दारु बाबत झडती घेतली असता, दुकानाच्या एका कोप-यात ०५ नग देशी दारुचे १८० मिली नी भरलेले प्रत्येकी किमती ५२/-रु. प्रमाणे एकुण किमती २६०/-रु. चा माल अवैधरित्या मिळुन आल्याने आरोपी हरेंद्र हिरामन बन्सोड वय ४२ वर्ष. रा.मसरामटोला, ता. सडक अर्जुनी यांचेविरुध्द पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्र.७५/२०२१ कलम ६५(ई), ७७(अ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच केवळराम कारु ठलाल वय ६० वर्ष रा. बाघनदी, ता. जि. राजनांदगांव हा आपले जवळ अवैद्य दारु बाळगुन, अवैद्य दारु विक्री करतो अशा माहीतीवरुन त्याची दारु बाबत झडती घेतील असता त्यांचे ताब्यातील एका पांढरे रंगाचे थैल्यात १४ नग देशी दारुचे १८० मिली. नी भरलेले प्रत्येको किमत ५२/-रु. प्रमाणे एकुण किमती ७२८/-रु. चा माल मिळुन आल्याने आरोपी केवळराम कारु ठलाल वय ६० वर्ष. रा. बाघनदी, ता.जि.राजनांदगांब यांचेविरुध्द पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्र. ७३/२०२१ कलम ६५(ई), ७७(अ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नरेंद्र रामकिशन टेंभुरकर वय ४५ वर्ष. रा. शेडेपार हा आपले घरी अवैद्य दारु विक्री करतो अशा माहीतीवरुन त्यांचे राहते घराची दारु बाबत झडती घेतील असता घराचे मागील खोलीत एका कोप-यात पिवळ्या रंगाचे थैल्यात १९ नग देशी दारु १८० मिली नी भरलेले प्रत्येकी ५२/-रु. किमत ९८८/- रु. चा माल मिळुन आल्याने आरोपी नरेंद्र रामकिशन टेंभुरकर वय ४५ वर्ष. रा. शेडेपार यांचेविरुध्द पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्र. ७१/२०२१ कलम ६५(ई), ७७(अ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अरुणा बालय्या परकेवार वय ४३ वर्ष, रा. पुतळी ही आपले घरी अवैद्य दारु विक्री करतो अशा माहीतीवरुन त्यांचे राहते घराची दारु बाबत झडती घेतील असता घराचे समोरच्या छपरीत लाकडी टेबलाखाली एका हिरव्या रंगाच्या पिशवीत १० नग देशी दारु १८० मिली नी भरलेले प्रत्येकी ५२/-रु. किमत ५२०/- रु. चा माल मिळुन आल्याने आरोपी अरुणा बालय्या परकेवार वय ४३ वर्ष, रा. पुतळी यांचेविरुध्द पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्र. ७४/२०२१ कलम ६५(ई), ७७(अ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राजेश श्रीराम कोचे वय ३९ वर्ष, रा. नैनपुर भरेगांव हा आपल्या घरी अवैद्य दारु विक्री करतो अशा माहीतीवरुन त्याचे राहते घराची दारु बाबत झडती घेतील असता, राहते घराचे माजघरात एका प्लास्टिक पिशवीत ०६ नग देशी दारु १८० मिली नी भरलेले प्रत्येकी ५२/-रु. किमती ३१२/- रु. चा माल मिळुन आल्याने आरोपी राजेश श्रीराम कोचे वय ३९ वर्ष, रा. नैनपुर/ भरेगांव यांचेविरुध पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्र. ७२/२०२१ कलम ६५(ई), ७७(अ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया, अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक सो.गोंदिया जालधर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगांव, अति.कार्य, देवरी यांचे मार्गदर्शनात पोनि. रेवचंद सिंगनजुडे, सपोनि. अजित कदम, पोउपनि. उरकुडे, पोहवा. मडावी, पोहवा, तिरपुडे, पोना.देसाई, पोना. बोहरे,पोना. करंजेकर, पोना, न्यायमुर्ती,पोना.उईके, पोशि. भांडारकर, पोशि. हातझाडे, पोशि. बोपचे, पोशि. चव्हाण, पोशि, नेवारे, मपोशि. सोनजाल, मपोशि,सोनवाने, मपोशि, पटले, मपोशि.निखाडे चापोहवा, राऊत यांनी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share