देवरी तालुक्यातून मनरेगा कामाला सावली शाळेमध्ये प्रथम सुरुवात

देवरी 24: मनरेगा अंतर्गत जिल्ह्यातील 100 शाळांमधून जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली येथे महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी देवरी यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे संचालन दिपक कापसे मुख्याध्यापक जि. प. सावली यांनी केले.

शाळेला एकूण प्रति काम पाच लाख याप्रमाणे नाली बांधकाम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पटांगण , पेविंग ब्लॉक ,गांडूळ खत प्रकल्प, कंपाउंड वाल, फळबाग लागवड ,मल्टी युनि टॉयलेट, शोष खड्डाअसे एकूण दहा कामे चांगल्या प्रतीची व्हावीत याबद्दल आशा व्यक्त केली.यामुळे जिल्हा परिषद शाळा सावली येथील पायाभूत सुविधेत अधिक भर होईल.कामाची देखरेख दाते साहेब इंजिनिअर यांच्या नियोजनानुसार होईल. प्रमुख उपस्थितीत डि बी साकुरे साहेब वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी देवरी, झुलन बाई पंधरे सरपंच,राजेश्वरी बिंजलेकर उपसरपंच , निर्मलाबाई मेंढे सदस्य, नाजुका बाई गौतम, निर्मलाबाई शिवणकर, कैलास भेलावे, पुष्पराज पंधरे ,संतोष कांस्मारे प्रवीण सोनटक्के व शिवणकर सचिव ग्रामपंचायत सावली, नंदकिशोर शेंडे , दीपक लांजेवार, तुषार कोवले, पुरुषोत्तम जनबंधू, कु. वर्षा वालदे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share