Breaking : कोरोनामुळे पाचवी ते नववीपर्यंत व अकरावीचे वर्ग पुनश्च बंद तर प्रतिष्ठानावरही निर्बंध ,प्रशासनाचे आदेश

प्रहार टाईम्स|भुपेन्द्र मस्के
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पाचवी ते नववी व अकरावी शाळा पूर्णपणे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र दुरस्थ पद्धतीने शिक्षण सुरू राहणार. असे आदेश जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना यांनी काढले.
व दुसऱ्या आदेशात कोरोना संक्रमणावर प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून संपुर्ण गोंदिया जिल्हयात शासनाकडून वेळोवेळी शिथील करण्यात आलेले निबंध व सुट देण्यात आलेल्या बाबी व निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशाला कायम ठेवून कोरोना विषाणूच्या रोखथाम करिता जिल्ह्यातील जीवनावश्यक आस्थापना , व्यवसाय व दुकाने वगळून इतर सर्व आस्थापना , व्यवसाय , दुकाने दररोज रात्री 20.00 वा . पासून सकाळी 7.00 पर्यंत बंद ठेवण्याबाबत दुसरे आदेश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी आज काढले.

Print Friendly, PDF & Email
Share