आणखी 74 पॉझिटिव्ह : 40 कोरोनामुक्त

कोरोनामुक्त रूग्णांची संख्या 7701
रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 87.06
168 अहवालाची प्रतीक्षा

गोंदिया 20: जिल्ह्यात आज नव्याने 74 कोरोना बाधित रुग्ण आढळले. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -46, तिरोडा तालुका -00, गोरेगाव तालुका -00,आमगाव तालुका-05, सालेकसा तालुका-00, देवरी तालुका- 11 सडक/अर्जुनी तालुका -04, अर्जुनी/मोरगाव-07 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील एक रुग्ण आज आढळून आला आहे.

कोरोनावर आज 40 जणांनी मात केली.तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका-25, तिरोडा तालुका-09, गोरेगाव तालुका-00, आमगाव तालुका -01, सालेकसा तालुका-01, देवरी तालुका-01, सडक/अर्जुनी तालुका – 01 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-02 असा आहे.

आतापर्यंत कोरोनातून 7701 रुग्ण मुक्त झाले.ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -4484, तिरोडा तालुका- 1011,गोरेगाव तालुका -324,आमगाव तालुका -526,सालेकसा तालुका- 356, देवरी तालुका-317,सडक/अर्जुनी तालुका-299, अर्जुनी/मोरगाव तालुका-304 आणि इतर-80 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -525,तिरोडा तालुका-94,गोरेगाव तालुका- 37,आमगाव तालुका-83,सालेकसा तालुका -10, देवरी तालुका-79, सडक/अर्जुनी तालुका- 64,अर्जुनी/मोरगाव तालुका-105 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील 09 असे एकूण 1006 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share