छत्रपती शिवाजी जयंती आणि रथ सप्तमी निमित्त स्वर्ण सखी देवरी यांचे अभिवादन

प्रतिनिधी

देवरी २२: छत्रपती शिवाजी जयंती आणि रथ सप्तमी निमित्त स्वर्ण सखी देवरीच्या महिला संत नरहरी मंदिर येथिल समाज भवनात एकत्रित येऊन समाजातिल विविध संस्कृतीवार चर्चा केली असुन छत्रपती शिवाजी महाराज व संत नरहरी महाराज यांना अभिवादन केले.

यप्रसंगी स्वर्ण सखी समूह देवरी च्या अध्यक्षा पुष्पा मस्के, उपाध्यक्षा रोहिणी कावले, सचिव ममता रोकडे, सहसचिव अल्का दुबे, कोषाध्यक्ष पुष्पा उदापूरे, सहकोशाधक्ष करुणा कुर्वे यांच्या सह सोनार समाज देवरी च्या सर्व स्वर्ण सखी उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमामधे उखाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन महिलांनी उत्तम उखाने सादर करित कार्यक्रमाची शोभा वाढविली.

सदर कार्यक्रमाला वैशाली टेटे आणि शुभांगी ढोमने यांच्या मार्गदर्शन लाभला असुन अतिशय साध्या पद्धतिने कार्यक्रम पार पडले.

कार्यक्रमाचे संचालन वैशाली टेटे यांनी केले असुन आभार प्रदर्शन अल्का दुबे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share