देवरी शहर धुक्यात हरवले…!

देवरी २०:

देवरी शहर व परिसरात सर्वत्र रात्रीपासून धुक्याची दाट चादर पसरल्याने दिवस उगवल्यानंतरही काही अंतरावरील व्यक्ति व वाहन स्पष्टपणे दिसत नसल्याने महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.

मागील दोन- तिन दिवसांपासून देवरी शहर परिसरात पहाटेच्या वेळी दव वर्षाव होत आहे. पावसाळा संपून थंडीची सुरुवात झाल्याची ही लक्षणे आहेत सध्या हवामानात बदल होऊन थंडी पडायला सुरुवात झाली आहे. दिवसा हवामानात उष्णता जाणवत असली तरी सायंकाळनंतर शहरातील वातावरणात गारवा येऊ लागला आहे.

आज पहाटेपासून सर्वत्र धुके पसरल्याने काही अंतरावरील देखिल स्पष्ट दिसत नाही. वाहनचालक गाडीच्या लाईट तसेच इंडिकेटर दिवे लावून वाहने चालवत होते. पहाटे पायी(मॉर्निगं वॉक) चालण्याकरिता जाणार्‍यांकरिता धुक्याची ही चादर वेगळीच पर्वणी ठरली होती . धुकं ऐवढ दाट होते की सकाळी सात वाजे पर्यंतही सुर्यनारायण धूक्यात हरवले होते.

Print Friendly, PDF & Email
Share