Axis बँक शाखा देवरीचा कारनामा, मिनिमम बॅलन्सच्या नावावर ग्राहकाला 13743/- रुपयेचा चुना

लॉकडाऊन काळात बँक व्यवहार न केल्यामुळे बँकेकडून ग्राहकांची सर्रास लूट

डॉ.सुजित टेटे | प्रहार टाईम्

देवरी ०१: आपल्या परिश्रमाने कमावलेल्या पैशातून मुलांच्या शिक्षण आणि भविष्याची स्वप्ने बघून आपल्या कामाचा काही भाग सर्व लोक मोठया विश्वासाने बँके मध्ये आपली कमाई जमा करतात.

नानाविविध योजना, विमा पॉलिसी , कर्ज, क्रेडिट कार्ड ,कमी व्याज आणि सेवा निशुल्क पुरविण्याची खात्री ग्राहकांना दाखवून बँक खाते उघडण्याचे सर्रास आमिष बँके कडून दिले जाते, त्या आमीषांना बळी पडून हजारो ग्राहक शहरात येणाऱ्या नवीन बँकेत खाते उघडतात.

परंतु अक्सिस बँक देवरी शाखे कडून ग्राहकांची भलमार लूटमार आज निदर्शनास आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, प्रमोद रोकडे रा. देवरी यांनी शहरात नवीन अक्सिस बँक ची शाखा सुरू झाल्याचे बँकेच्या कर्मचाऱ्यांने भेट देऊन कळविले आणि खाते उघडण्यासाठी विविध सेवा सुविधांचे आमिष दाखविले त्यावर विश्वास ठेवून ग्राहकांनी बँकेत खाते उघडले. (खाता क्र. xxxx1264 )

देशात कॉविड विषाणू च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण लॉकडाऊन झाले त्यामुळे बँकेचे सदर ग्राहकांने बँकेत कुठलेही व्यवहार केले नाही. विविध सेवा चार्जेस मुळे खात्यातील रक्कम कमी झाली आणि त्याचीच शिक्षा म्हणून तब्बल 13743/- रुपयांचा चुना ग्राहकाला बँकेने लावला.

सदर ग्राहकाने आपल्या कमाई तील 20000/- रुपये दि. 30 जानेवारीला 3:54 वाजता बँकेत online जमा केला असता फक्त 7852 /- बँकेचा संदेश मिळताच ग्राहकाला जणू धक्काच बसला.
आज सोमवार 01 फेब्रुवारी ला बँक मध्ये जाऊन चौकशी केली असता सदर कारनामा समोर आला असून बँक व्यवस्थापकांनी रक्कम वापसी साठी आपले हात वर केले.

आपली कमाई ठेवायची कुठे? असा प्रश्न ग्राहकांनी पडला असून प्रमोद रोकडे यांनी मेहनतीच्या कमाई वर डल्ला मारणाऱ्या बँकतुन तात्काळ खाते बंद करून न्याय ची दाद मागण्यांसाठी बँक प्रशासनाच्या हेड ऑफिस ला मेल केले असल्याचे सांगितले.

आपल्या खात्यातिल रक्कमेची सर्व ग्राहकांनी खातरजमा करुन घ्यावी जेने करुण इतर ग्राहकाँची फसवनुक होणार नाही असे सूचना प्रमोद रोकडे यांनी सर्व ग्राहकांना सूचित केले आहे.

प्रहार टाईम्स च्या प्रतिनिधींनी बँक व्यवस्थापक तायडे यांच्या शी प्रत्येक्षात सदर प्रकारांवर चर्चा आणि विचारपूस केली असता 1200 ग्राहक खाते असल्याचे सांगत ग्राहकाना आम्ही सूचना देऊ शकत नाही आणि 13746/- परत होणार नाही असे बोलत आपले मत मांडले.

बँके कडून होणाऱ्या लूट थांबविण्यासाठी न्याय मागायचा कुठे असा प्रश्न ? खाते धारकांना उपस्थित झाला असून शेतकरी , दुकानदार यांच्या ठेवींवर डल्ला मारणाऱ्या बँकेवर कारवाई ची प्रतीक्षा जनतेला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share