क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता मी कटिबद्ध आहे -आमदार सहषराम कोरोटे


★देवरी येथे काँग्रेस पक्षातर्फे महिलांसाठी सामूहिक हळदी कुंकू


देवरी,ता.२८: आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राच्या विकास कामा करिता आपन मला आमदार म्हणून निवडून दिले. मागच्या वर्षी कोरोना विषानुचा प्रादुर्भामुळे देशासह राज्याची आर्थिक परिस्थिति विकट होती. त्यामुळे कोणतेही विकास कामें करता आली नाहीत. परंतु आता परिस्थिति हळूहळू वसरत आहे. आणि आता आपल्या क्षेत्रात रेगांळलेले अनेक विकास कामें पूर्ण होणार आहे. यावर्षी देवरी तालुक्यातील आदिवासी अति दुर्गम गाव चिलंगटोला येथील रस्त्याकरिता १कोटि ४० लक्ष रुपये, सालेकसा तालुक्यातील भजियापार येथील पुला करिता ६ कोटि रुपये निधि मंजूर झाले आहेत. त्याचप्रमाणे आमगांव शहरातील रास्त्याकरिता ८१ कोटि ८४ लक्ष रुपये निधि मंजूर करून हे काम युध्द स्तरावर सुरू आहे। मंजूर झालेल्या सर्व विकास कामाचे भूमिपूजन लवकर करुण या कामांना सुरुवात होणार आहे. देवरी शहराच्या विकासा करिता मी दोन पाऊल पुढे जाइन येथील आवश्यक विकास कामे मार्गी लावणार आहे. अशाप्रकारे क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
ते देवरी येथे आमदार कोरोटे यांच्या निवास्थानी सामाजिक कार्यकर्ता तथा आमदार यांची धर्मपत्नी सीमाताई कोरोटे आणि देवरी तालुका महिला काँग्रेस तर्फे सोमवारी(ता.२५ जानेवारी) रोजी आयोजित महिलांसाठी “सामूहिक हळदी कुंकू” कार्यक्रमात विशेष अतिथिच्या रुपात मार्गदर्शन करतांनी बोलत होते.


या हळदी कुंकू कार्यक्रमाचे उद् घाटन गोंदिया जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष उषाताई शहारे यांच्या हस्ते आणि गोंदिया जि.प.च्या माजी अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली व दिप प्रज्वलन जि.प.च्या माजी महिला व बालकल्याण सभापति लताताई दोनोड़े यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी विशेष अतिथि म्हणून आमदार सहषराम कोरोटे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, देवरी तालुका अध्यक्ष संदीप भाटिया, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, आणि प्रमुख अतिथि म्हणून सीमाताई कोरोटे, माजी जि.प. सदस्य माधुरी ताई कुंभरे, किरणताई राउत, छब्बूताई ऊके, वंदनाताई काळे यांच्या सह देवरी तालुक्यातील महिला सरपंच व महिला काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला सेकडोच्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करतांनी आमदार सहषराम कोरोटे पुढे म्हणाले की, आपला भाग हा धान उत्पादक क्षेत्राचा भाग आहे. येथे शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी सर्व सामान्य लोक राहतात. त्यांच्या मुला-मुलींनी ही उच्चशिक्षण घेवून आपले उज्वल भविष्य घड़वावे असी इच्छा असते. त्याचे मुले डॉक्टर, वकील, इंजीनियर, आई.पी.एस. व आई.ए.एस. व्हावे असे त्यांना वाटते.या करिता खुप पैसा लागतो. मी आमदारच्या निवडणुकीत सर्वांना आश्वासन दिले होते की, मी तुमच्या मुलांकरिता उच्चशिक्षणा करिता मार्गदर्शन पर प्रशिक्षण केन्द्राची सोय करुण देणार म्हटले होते. यांची वचनपुर्ति करित यावर्षी पासून बारावीच्या पेपर झाल्यानंतर लगेच देवरी, आमगांव व सालेकसा तालुक्यातील इच्छुक विद्यार्थी करिता जे.ई.ई(JEE), नीट(NEET), एम.एच.टी.(MHT), सी.ई.टी(CET), यू.पी.एस.सी(UPSC) व एम.पी.एस.सी. (MPSC)या उच्च परिक्षेचे मार्गदर्शना करिता आधार फाउंडेशन तर्फे कोचिंग क्लासेस ची सोय होणार आहे. या करिता मी आधार फाउंडेशन ला वर्षाचे १५ लक्ष रुपये देणार आहो. याचा लाभ या क्षेत्रातील उच्चशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे असे कोरोटे यांनी म्हटले.


दरम्यान महिला काँग्रेसच्या वतीने उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून वान वाटप करण्यात आले आणि महिलां करिता संगीत खुर्ची व उखाने स्पर्धा ही घेण्यात आले. या प्रसंगी रत्नदीप दहिवले, संदीप भाटिया, उषाताई मेंढे आदिंनी मार्गदर्शन केले.
यावेळी जि.प.चे माजी समाज कल्याण सभापति संतोष मडावी आपल्या धर्मपत्नी सोबत आमदार कोरोटे व काँग्रेस पक्षाच्या विकासात्मक धोरणांशी प्रभावित होउन काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका महिलाध्यक्ष सुभद्रा अगड़े यांनी तर संचालन जिल्हा महिला अध्यक्ष उषाताई शहारे यांनी आणि उपस्थितांचे आभार माजी जि.प.सदस्य माधुरीताई कुंभरे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share