कोयलारी येथील तलावात बुडून ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू


देवरी २५: जिल्ह्यातील देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोयलारी गावच्या तलावात कोयलारी येथील झामलाल तेजराम डोंगरवार वय 35 वर्षे हा व्यक्ती मच्छी पकडण्यासाठी तलावात गेला असता तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला.
सदर व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढून पंचनामा करून पोस्टमार्टम करिता देवरी ला पाठवण्यात आले.
पुढील तपास देवरीचे शेंडा बीट चे जमादार करीत आहेत. मृतकाच्या मागे पती-पत्नी दोन मुले आई वडील परिवार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share