गोंदिया पोलीसांची मोठी कारवाई, जंगल परिसरातुन विस्फोटके व ४ लाख ४० हजार रु जून्या नोटा जप्त

डॉ. सुजित टेटे

गोंदिया,२४: रोजी श्री विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांना गुप्त बातमीदाराकडुन विश्वसनीय माहिती प्राप्त झाली की, पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत मौजा उमरपायली ते जुनेवाणी रोडच्या लगतच्या पहाडीवर जंगल परिसरात घातपात घडवुन आणुन पोलीसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी स्फोटक साहित्य पेरुन ठेवलेले आहे.

सागाच्या झाडाच्या दोन मोठया दगडाच्या कपारीत एका प्लॉस्टीकच्या ड्रम मध्ये काही संशयास्पद वस्तु आढळुन आल्याने बी.डी.डी.एस. पथक व श्वानाच्या साहाय्याने खबरदारीच्या उपाययोजना करुन पाहणी केली असता नक्षलवाद्यांनी घातपात घडवुन आणुन पोलीसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी स्फोटके साहीत्य लपवुन ठेवल्याचे दिसुन आले.

सदर स्फोटक साहीत्य बी.डी.डी.एस पथकाच्या मदतीने बाहेर काढले असता त्यामध्ये १) युरीया खत अंदाजे दिड ते दोन किलो
२) ५० ग्राम निरमा पावडर ३) एक स्विच बटन ४) लाल रंगाची ईलेक्ट्रीक वायर ५) जुन्या ५०० रुपये दराचे चलणी नोटा
रुपये ४,४०,०००/-(अक्षरी चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचे) ६) गंधक १० ग्राम (कारपेट) ७) कापूरवडी ८) एक
जुनी भरमार बंदूक (सिंगल बोर) असे स्फोटक साहित्य नक्षलवाद्यांनी घातपात घडवुन आणण्यासाठी लपवुन ठेवल्याचे
आढळुन आले. सदर साहीत्य जप्त करण्यात आले असुन पो.स्टे. केशोरी येथे गु.र.नं. ० ९/ २०२१ कलम ३०७, भादंवी
सहकलम १७, १८,२०,२३ यु.ए.पी.ए. सहकलम ४, ५ भारतीय स्फोटक पदार्थ कायदा, सहकलम ३/२५ भारतीय हत्यार
कायदा अन्वये नक्षलवाद्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी, देवरी श्री
जालींदर नालकुल हे करीत आहेत.

सदर ची कारवाई श्री विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनात, श्री अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री जालींदर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, श्री संदीप इंगळे, ठाणेदार पो.स्टे. केशोरी, पोउपनि मुंडे, पो.स्टे. केशोरी व तेथील अंमलदार, पोउपनि नागरे, सी -६० कमांडो पथक नवेगावबांध, बिडीडीएस पथक गोंदिया चे अधिकारी व अंमलदार यांनी केली असुन कारवाई मध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share