जिल्ह्यातील वाळुघाटाचे ई-लिलाव


गोंदिया,दि.24: महसूल व वन विभागाच्या 3 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार सन 2020-21, 2021-22 व 2022-23 या तीन वर्षाकरीता गोंदिया जिल्ह्यातील राज्यस्तरीय पर्यावरण प्राधिकरणाच्या अधीन राहून मान्यताप्राप्त एकूण 10 रेतीघाटांचा ई-निविदा व ई-लिलाव पध्दतीने करावयाचे असल्याने वाळूघाटाचे रजिस्ट्रेशन (नोंदणी) 23 जानेवारी 2021 रोजी ऑनलाईन पध्दतीने सुरु झाली. 2 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन नोंदणी बंद होईल. 3 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजतापासून ई-निविदा ऑनलाईन पध्दतीने जमा करणे सुरु होईल. 8 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता ई-निविदा ऑनलाईन पध्दत बंद होईल व 9 फेब्रुवारी 2021 रोजी प्रत्येकी रेतीघाटाचे ई-निविदा डाऊनलोड करुन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ई-निविदा उघडण्यात येईल. वाळूघाट लिलावासंबंधी अटी व शर्ती वाळूघाट यादी व इतर माहिती http://gondiaco.abcprocure.com व www.gondia.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे.


ई-निविदा व ई-लिलाव बाबत प्रशिक्षण 28 जानेवारी 2021 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. तरी इच्छुक कंत्राटदारांनी प्रशिक्षणास उपस्थित राहावे. असे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी कळविले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share