गोंदिया,दि.24 : 25 जानेवारी 2021 हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करावयाचा असून या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी ‘‘सर्व मतदारांना सशक्त, सतर्क, सुरक्षीत आणि जागरुक बनविण्यासाठी कटिबध्द’’ हा विषय आयोगाकडून देण्यात आला आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 25 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत असून याबाबत तालुक्यामधील शाळा व महाविद्यालय स्तरावर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादी प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात 25 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी कळविले आहे.

Share