गोंदिया जिल्हात बर्ड फ्लुची एंट्री

प्रहार टाईम्स

गोंदिया २२ : प्राप्त माहितीच्या नूसार गोंदिया जिल्हातिल निम्बा येथिल पोल्ट्री फार्म चे नमूने पॉज़िटिव आले असुन गोंदिया जिल्हात बर्ड फ्लु एंट्री केल्याचे समजते.

राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असल्याचे पशुसंवर्धनमंत्र्यांनी केले ‘हे’ महत्त्वाचे आवाहन:

राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असून कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही तर काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी पुन्हा एकदा केले आहे.

‘बर्ड फ्लू या विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यांच्यामार्फत होत नाही. मांस, अंडी व मासे तुम्ही खाऊ शकता’, असेही सुनील केदार यांनी स्पष्ट केले. समाजमाध्यमे व काही प्रसिद्धी माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या अकारण भीती पसरविणाऱ्या बातम्या व अफवांपासून सावध राहा, असे आवाहनही मंत्री केदार यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share