राष्ट्रवादी महिला कॉग्रेस देवरी तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा

देवरी २१: राष्ट्रवादी महिला कॉग्रेस देवरी तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला याप्रसंगी सौ. पारबताबाई चांदेवार , तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला कांग्रेस यांच्या अध्यक्षते स्थानी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे पुजन करून दिप प्रज्वलन सौ.सुमन बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित महिलांना सौ. मंजुषाताई वासनिक , सौ.सुमनताई बिसेन ,सौ.शम्रिलाताई टेंभुर्णीकर , सौ.अर्चना ताराम यांनी मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित महिला भगिनींना हळदी कुंकू लावून वाण देण्यात आले. हळदी कुंकू च्या कार्यक्रमासोबतच महिलांचा संगीत खुर्ची स्पर्धा व 1 मिनिटात उखाणे म्हणण्याची स्पर्धा घेण्यात आली . बहुसंख्येने महिलांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला व विजयी महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.शर्मिला टेंभुर्णीकर महिला शहराध्यक्षा राष्ट्रवादी देवरी , सौ.प्रमिला गावळकर महिला तालुकाध्यक्षा आदिवासी विभाग, कु. माधुरी शहारे, , सौ. उषाताई तिवारी , सौ. कोमल अग्रवाल सौ. अँड. रूपाली गोडसेलवार , सौ.प्रियंका सलामे ,सौ.ममता गिरी ,सौ.किरनताई चनाप , सौ. शितलताई आंबिलकर , सौ.टेंभरे , सौ.संगिता शाहु ,सौ.कोमल खरोले , सौ. अंजली शेंडे , पुष्पाताई मस्के , सौ.मीना कुंभरे , सौ.पुष्पाताई राहांगडाले , सौ.सुधाताई ताराम , प्रतिमाताई देशपांडे , सौ.रिताताई शिवणकर , सौ. रिताताई ताराम ,सौ.नलीनीताई बहेकार , सौ.गंगासागर मानकर , सौ.प्रियंका फुंडे , सौ. इंदिरा लांडेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Print Friendly, PDF & Email
Share