आज देवरी नगरपंचायत तर्फे भव्य सायकल रैली

डॉ. सुजित टेटे

देवरी १९- महाराष्ट्र शासन व्दारा दि.2 ऑक्टो.2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत “माझी वसुंधरा” अभियान राबविन्यात येत असून पृथ्वी,वायु,जल,आकाश,अग्नि,या पंच तत्वावर उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिन्यासाठी नगर पंचायत देवरी कडून माझी वसुंधरा अभियान अंर्तगत भव्य सायकल रैली दि.19/01/2021 रोज मंगळवार ला सकाळी 10:30 वाजता नगर पंचायत कार्यालय समोर आयोजित करण्यात येत आहे.

हि भव्य सायकल रैली नगर पंचायत समोरून सुरुवात होऊन संपूर्ण देवरी नगराचे भ्रमण करून न.पं कार्यालय येथे समापन होणार आहे. तरी या भव्य सायकल रैली मध्ये आपन नगरातील सर्व जनतेनी सहभाग घेऊन पर्यावरण बचाव या मोहिमेत सहभागी व्हावे असे आव्हान मुख्याधिकारी नगर पंचायत देवरी यांचे वतीने करण्यात येत आहे.

टिप:- सदर सायकल रैली मध्ये स्वतकडुन सायकलची व्यवस्था करावी असे मुख्याधिकारी अजय पाटनकर नगरपंचायत देवरी यांनी जाहिर केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share