मुंबईचे विमानतळ अखेर ‘अदानी’कडे; मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई १८:

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर ‘अदानी एअरपोर्टस’कडे सोपविण्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर ‘अदानी एअरपोर्टस’कडे सोपविण्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. या विमानतळात २६ टक्क्यांची भागीदारी असलेल्या केंद्र सरकारच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) त्याला मंजुरी दिली आहे.

मुंबईचे विमानतळ याआधी जीव्हीके, एएआयसह अन्य दोन भागीदारांच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) या कंपनीकडे होते. यांत जीव्हीकेची भागीदारी सर्वाधिक होती. पण जीव्हीके समूह आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच विमानतळात सुरुवातीपासून असलेले दोन महत्त्वाच्या भागीदारांनीही जीव्हीके समूहापासून फारकत घेतली. त्यावेळी जीव्हीकेने दुसरीकडून निधीचे उभारून विमानतळावरील स्वत:चा ताबा वाचवला. पण मागीलवर्षी या विमानतळाच्या आर्थिक व्यवहारांप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केल्यापासून जीव्हीकेला हे विमानतळ अदानी समूहाला विक्री करावेच लागले. या व्यवहारासंबंधीदेखील विविध स्तरावर आक्षेप नोंदविण्यात आले होते. पण एएआयने अलिकडेच या व्यवहाराला हिरवा कंदिल दिला.

अदानी एअरपोर्ट्स ही कंपनीने विमानतळातील जीव्हीकेचा ५०.५० टक्के हिस्सा खरेदी केलेला आहे. त्यानंतरही जीव्हीके समूहाच्या विमानतळ उपकंपनीच्या डोक्यावर ३,७३९ कोटी रुपयांचे कर्ज असेल. तर मिआलच्या डोक्यावर ८,१०९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे दोन्ही कर्ज मिळून त्यातील ९५ टक्के रक्कमेचा भरणा अदानी एअरपोर्ट्स करणार आहे. त्याद्वारे या विमानतळाची ७४ टक्के भागीदारी ‘अदानी’कडे येईल. तर उर्वरित २६ टक्क्यांमध्ये एएआयची हिस्सेदारी कायम असेल. याच व्यवहाराला ‘एएआय’ने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share