सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिंदे यांना देवरी शहरातील घरकुल व जमिनीच्या पट्टया संदर्भात निवेदन

आमगांव येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात देवरी तालुका शिवसेना तर्फे निवेदन सादर करुण चर्चा

देवरी, ता.१४; आमगांव येथील विजयालक्ष्मी सभाग्रुहात बुधवारी(ता.१३ जानेवारी) रोजी आयोजीत शिवसैनिकांचा मेळावा व आढावा बैठकीत मुख्य अतिथींच्या रुपात उपस्थितीत राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख निलेशराव धुमाळ यांच्या नेतृत्वात देवरी तालुका शिवसेना शाखेच्या वतीने देवरी शहरातील घरकुल लाभार्थी यांना अनुदानाची न मिळालेली उर्वरीत निधि व अतिक्रमण धारकांच्या जमिनीच्या पट्टयाच्या संदर्भात निवेदन देवून या विषयावर आढावा बैठकीत चर्चा ही करण्यात आली.


ना.एकनाथ शिंदे यांना सादर केलेल्या निवेदनात अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त देवरी हे शहर अर्ध्यापेक्षा जास्त अतिक्रमनाच्या जागेवर वसलेला आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांचे येथील जागेच्या पट्याचे प्रश्न हे अनेक वर्षापासून रेंगाळत आहेत. देवरी शहरातील बहुतांष लोकांची घरे, झोपड्या हे अतिक्रमनाच्या जागेवर असल्याने पंतप्रधान आवास योजने अन्तर्गत मिळणाऱ्या घरकुलाचा प्रश्न हा गंभीर स्वरूपाचा आहे. अनेक लोकांनी घरकुलासाठी अर्ज केला होता. परंतु बहुतांश गरीब लोकांचे घरकुल जागेच्या पट्टया अभावी नामंजुर झाले आहेत. ज्या ११३ लोकांना घरकुल मंजूर झाले. अशांना एक वर्षापेक्षा अधिकचा कालावधी लोटून सुद्धा त्यांना मिळणाऱ्या अनुदानाची पूर्ण रक्कम अद्याप मिळालेली नाही असा उल्लेख आहे.


या सर्व विषयावर नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर देवरी येथील अतिक्रमण धारक लोकांचे जमिनीचे पट्टे व उर्वरित घरकुलाची अनुदान रक्कम संदर्भात ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या अडचणी दूर करुण हा प्रश्न मार्गी लावन्याचा प्रामाणिक प्रयत्न करु असे बोलून दाखविल्याने आता देवरी शहरातील लोकांना अतिक्रमण जमिनीचे पट्टे व घरकुलाची रक्कम मिळवुन देण्याविषयी ना.एकनाथ शिंदे हे सकारात्मक आहेत हे दिसून आले.


सदर निवेदन देतांनी व या विषयावर चर्चा करतांनी शिवसेनेचे गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख निलेशराव धुमाळ , देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा, शिक्षकसेनेचे तालुकाप्रमुख अनिल कुर्वे, विधानसभेचे संघटक राजिक खान, देवरी शहर प्रमुख राजा भाटिया, महिला आघाडी तालुका प्रमुख प्रीति उइके, शिवसैनिक महेश फुन्ने, कृष्णा राखडे, करुणा कुर्वे, वंदना राउत, सलमा राऊत यांच्या सह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share