डॉ काउंट सीझर मॅटी यांची जयंती उत्साहात साजरी

राकेश रोकड़ें/प्रहार टाईम्स

सालेकसा १४: मेडीकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी जिल्हा गोंदिया च्या वतीने 11 जानेवारीला मांडोदेवी देवस्थान येथे काउंट सिझर मॅटी यांची ची 212 वी जयंती ती उत्साहाने साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमइएच संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर के.जी.तुरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अमित खोडनकर तालुका वैद्यकीय अधिकारी सालेकसा/ आमगाव. डॉक्टर संतोष येवले सचिव एमइएच जिल्हा गोंदिया,डॉक्टर राजेश तिवारी कोषाध्यक्ष,डॉ के.बी. राणे महासचिव, डॉक्टर आर. टी. चौधरी ,डॉक्टर सी एस भगत, डॉक्टर बी ए बावनकर उपस्थित होते.

जयंत जयंतीनिमित्त डॉक्टर अमित खोडनकर यांनी आपल्या संबोधन मध्ये म्हटले की इलेक्ट्रो होमिओपॅथी वर विश्वास ठेवून आपल्या पॅथी मध्ये उपचार करा चांगले संशोधन करा तरच आपली पॅथी नक्कीच एक दिवस राजपत्रित होईल. त्याचप्रमाणे अध्यक्षस्थानावरून डॉ. के.जी. तुरकर यांनी इलेक्ट्रो होमिओपॅथी च्या आजच्या घडामोडीवर मार्गदर्शन केले सोबतच संघटनेच्या कार्यावर भर देऊन संघटनेला मजबूत करण्याचे चे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संतोष येवले यांनी केले तर संचालन डॉक्टर योगेश हरिणखेडे व आभार डॉक्टर सी एच भगत यांनी मानले कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता डॉक्टर सूर्यवंशी डॉक्टर गणेश बीसेन डॉक्टर डोये डॉक्टर दीपक बहेकार,डॉक्टर अंबुले, डॉ प्रशांत डॉ. शरणागत डॉक्टर टेंभरे ,श्री कृष्णा पटले, श्री येल्ले यांनी अथक परिश्रम घेतले.

Print Friendly, PDF & Email
Share