देवरी १४ राज्य परिवहन भंडारा विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रकांत ना. वडस्कर यांनी शंभर टक्के मराठी भाषेचा वापर न केल्यामुळे प्रती चूक करीता शंभर रुपये याप्रमाणे तीन जागी इंग्रजी भाषेचा वापर केल्यामुळे मराठी भाषा दक्षता अधिकारी विभागीय कार्यालय रा. प. भंडारा यांनी 300 /- रुपयाचा दंड ठोठावला आहे.


मराठी भाषा दक्षता अधिकारी यांनी त्यांचे पत्र क्र. राप / विनि / भं / काम / 595 दिनांक 26 / 10 / 2020 अन्वये विभा लेखा अधिकारी रा. प. भंडारा यांना त्यांच्या वेतनातून 300 /- रुपये वसुल करण्याचे तसेच विशेष म्हणजेच, विभागीय कर्मवर्ग अधिकारी रा. प. भंडारा यांना दंडाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकेत करण्याकरिता विशेष पत्र दिले आहे. मराठी भाषेला चालना देण्यासाठी एसटीचा व्यवहार मराठीतूनच करण्याची सक्ती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे.
अशीच दंडात्मक कारवाई पुन्हा इंग्रजीत स्वाक्षरी केल्याने गडचिरोली विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे यांनी तीन पत्रावर इंग्रजीत स्वाक्षरी केल्याने प्रत्येक स्वाक्षरीसाठी शंभर रुपये याप्रमाणे तीन स्वाक्षरीसाठी 300 /- रुपयाचा दंड गडचिरोली विभागीय मराठी दक्षता अधिकार्‍यांनी केल्याची माहिती आहे; हे विशेष.

Share