रामनवमीच्या पार्श्वभूमीवर देवरी पोलीसांचे पथसंचलन

देवरी ◼️पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या संकल्पनेतुन अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे देवरीमार्फत रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सव दरम्यान पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही व सदर उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे कामी कोणतेही अनुचित घटना घडणार नाही. सदर उत्सव शांतता पार पाडण्यासाठी देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत चिचगड रोड, राणी दुर्गावती चौक , बाजार लाईन, कारगलि चौक , पंचशिल चौक, मसक-या चौक , बौध्द विहार क्षेत्रात प्रवीण डांगे ठाणेदार देवरी यांचे नेतृत्वात पथसंचालन करण्यात आले व कारगिल चौक येथे दंगा काबु योजनाची सराव करण्यात आले. पथसंचालनामध्ये पोलीस स्टेशन देवरी येथिल २० कर्मचारी , नक्षल सेल देवरीचे पोउपनि बाहेकार, चिचगड येथिल पोउपनी हुर्रे, ४ कर्मचारी पोस्टे डुग्गीपार, ५ कर्म. उपमुख्यालय देवरी , ११ कर्म. अप्पर पोलीस अधिक्षक देवरी , २ कर्म उपविभागीय पोलीस अधिकारी ४ कर्म हजर होते.

Print Friendly, PDF & Email
Share