रामनवमी निमीत्त ठाणेदार सिंगणजुडे यांच्या नेतृत्वात डूग्गीपार पोलिसांचा रुट मार्च,

अर्जुनी स ◼️डुग्गीपार पोलिस स्टेशन अतंर्गत सडक अर्जुनी शहरातून पोलिस निरिक्षक रेवचंद शिगंनजुडे यांच्या मार्गदर्शनात रूट मार्च घेण्यात आला. आगामी रामनवमी उत्सवाच्या अनुषंगाने डुग्गीपार पोलिस ठाणे हद्दीतील सडक अर्जुनी शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलिस निरिक्षक रेवचंद सिंगणजुडे यांच्या मार्गदर्शना खाली सडक अर्जुनी शहरातून पोलिसांचा रूट मार्च काढत रंगीत तालीम, दंगा काबु व पथसंचलन घेण्यात आला.

सदर पथसंचलना मध्ये श्री भिसे Sdpo आमगाव, पोस्टेचे 2 अधिकारी 28 अंमलदार, उपमुख्यालय व पो.स्टे. देवरीचे 18 अंमलदार असे एकूण 03 अधिकारी 46 पोलीस अंमलदार हजर होते. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्याविषयीचे उपक्रम राबवावेत, स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियम व तरतुदीचे काटेकोर पालन करावे अस आवाहनही पोलिस निरीक्षक रेवचंद सिगंनजुडे यानीं यावेळी केले आहे .

Print Friendly, PDF & Email
Share