जुन्या पेंशनच्या समर्थनात लागले नक्षल्यांचे बॅनर

गोंदिया ◼️ गेल्या आठवड्यात जुन्या पेंशनला घेऊन राज्यसरकारी कर्मचारी व अधिकारी वर्गाने आंदोलन करुन सरकारला जेरीस आणले होते. मात्र संघटनाच्या समन्वय समितीने संप मागे घेतला. मात्र, आज रविवार, 26 मार्च रोजी जिल्ह्यातील आमगाव-सालेकसा मार्गावर सीपीआय माओवादी या नक्षल संघटनेचे जुन्या पेंशनच्या समर्थन असल्याचा मजकूर असलेले बॅनर आढळून आले. नवीन पेंशन योजना रद्द करण्यात यावे, ठेकेदारीकरण बंद करण्यात यावे. मेस्मा कायदा लागू करणार्‍या शिंदे-फडणवीस सरकार मुर्दाबाद अशा अनेक घोषणा बॅनरवर लिहिलेल्या आहेत. हे पत्रक महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड झोनल (माओवादी) कमेटीचा प्रवक्ता अनंत यांच्या नावे आहे.

Print Friendly, PDF & Email
Share