देवरी पोलीसांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी शिबीर संपन्न, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांची हजेरी

◼️पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची शिबिराच्या माध्यमातुन दखल

देवरी ◼️ रोजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे पोलीस विभागाच्या स्तुत्य उपक्रमातून देवरी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोंदिया पोलीस विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर , देवरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रवीण डांगे, पीएसआय कळंबकर, पीएसआय बहाकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुंबई येथील डॉ. पी. एस. देसाई, डॉ.दिपक मोरे , डॉ. दिपक सोनवणे, डॉ.बिट्टू सिंह , माशुम शेख, संकेत रावणम आदि उपस्थित होते.

या आरोग्य तपासणी शिबिरात ३अधिकारी , ८८ पोलीस अंमलदार व परिवार यांची तपासणी करण्यात आलेली आहे. सदर शिबिरातून आरोग्यदायी जीवनाचा सल्ला आणि मार्गदर्शन पोलीस कुटुंबीयांना देण्यात आला. अतिशय उत्साहात पोलीस कुटुंबांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.

Print Friendly, PDF & Email
Share