ब्लॉसम शाळेत ‘गुढी पाडवा’ मराठी नववर्ष उत्साहात साजरा

देवरी 21: तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे गुढी पाडव्याच्या पावन पर्वावर मराठी नववर्ष प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात उत्साहात साजरा करण्यात आला.

मराठी संस्कृती आणि मराठी नववर्षाची माहिती विदयार्थ्यांना असावी, मराठी संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने गुढी पाडवाच्या पर्वावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सुजित टेटे , मनीषा काशीवार, तनुजा भेलावे, कलावती ठाकरे, योगिता मेश्राम, चंद्रकांत बागडे, नलू टेंभरे, स्वप्नील पंचभाई उपस्थित होते.

यावेळी गुढी उभारून मराठी गौरव गीत सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमात प्ले ग्रुप , नर्सरी , केजीच्या विद्यार्थ्यांनी मराठी वेशभूषेत नृत्य सादर केला. शाळेतील उत्साही विद्यार्थी मराठी वेशभूषेत शाळेत हजर होते. मराठमोळ्या अंदाजात नृत्य सादर करून मराठी नवीन वर्षाचा स्वागत केला. यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊ वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वप्नील पंचभाई यांनी केले असून आभार प्रदर्शन तनुजा भेलावे यांनी मानला.

Print Friendly, PDF & Email
Share