कम्युनिटी पोलीसिंगच्या माध्यमाने पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत स. दु. बोन्डे मार्फत राबविण्यात आलेले स्तुत्य उपक्रम

देवरी ◼️ पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, यांचे संकल्पनेतून मा. अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री.अशोक बनकर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी,उपविभाग देवरी श्री. संकेत देवळेकर, यांचे मार्गद र्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस दल ” दादालोरा” खिडकी योजने अंतर्गत अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागा तील लोकांच्या जनहितार्थ त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा, व त्यांनी मुख्य प्रवाहात येऊन त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत विविध उपक्र माचे आयोजन करण्यात येत असून राबविन्यात येत आहेत. या अनुषंगाने माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शना खाली स.दु.बोन्डे मार्फत” दादालोरा खिडकी योजने” अंतर्गत 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त महाराष्ट्र शासन डिजिटल ग्रामीण सेवा अंतर्गत आयुष्यमान भारत योजना (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) व आयुष्य मान भारत हेल्थ कार्ड (आभा कार्ड )आणि आधार कार्ड अपडेट असा उपक्रम दि.08/03/23 ते 11/03/23 पर्यंत राबवि ण्यात आले. सदर उपक्रम दरम्यान ऑपरेटर यांची जेवणाची व राहण्याची वेवस्था AOP बोन्डे येथे करण्यात आली होती..

दि 08/03/23 :- आभा कार्ड =58, आयुष्य मान भारत (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ) = 24

दि 09/03/23:- आभा कार्ड = 33 आयुष्यमान भारत आरोग्य योजना =64

दि 10/03/23:- आभा कार्ड =189 आयुष्यमान भारत आरोग्य योजना= 88

दि 11/03/23:- आभा कार्ड =07 आयुष्यमान भारत आरोग्य योजना =33 अश्या प्रकारे एकूण := आभा कार्ड :- 287 आयुष्यमान भारत (प्रधान मंत्री जन आरोग्य योजना) := 209 आणि एकूण 44 आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली.

मा. वरिष्ठांचे मार्गदर्शना खाली सदर उपक्रम यशस्वि रित्या पार पाडण्यासाठी सशस्त्र दूरक्षेत्र -बोंडे येथील पोलीस अधिकारी पो. उप. नि. श्री. राहुल दुधमल आणि पोलीस अंमलदार यांनी, वेळोवेळी पाठपुरावा करून अथक परिश्रम घेवून उपक्रम राबविले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share