त्रिमूर्तीनगर येथे भरदिवसा 2.92 लक्ष किमतीचे दागिने चोरीला, CCtV च्या आधारे देवरी पोलिस चोराच्या शोधात !

देवरी ◼️ मागील काही दिवसात देवरी शहरात चोऱ्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. यामध्ये मोटार सायकल, मोबाईल फोन चोरीला जाण्याचे घटना ताजे असतांना ०१/०३/२०२३ चे ११:०० वा. ते १५:०० वा. दरम्यान महिला फिर्यादी सौ. वंदना रमनलाल चुटे, वय ३८ वर्ष, रा. त्रिमुर्तीनगर देवरी, ता. देवरी यांचे देवरी येथे घरापासुन ०१ किमी अंतरावर दुर्गा चौकात पशु आहार दुकान व दुध डेअरी आहे. फिर्यादी व तिचे पती हे दिवसभर दुकानात असतात व मुलगा शाळेत गेलेला असतो. तिघाकडेही घराचे कुलुपाचे एक एक चाव्या आहेत. नमुद घटनेच्या वेळी व ठिकाणी फिर्यादी व तिचे पती दुकानात असतांनी मुलगा कुणाल हा शाळेतुन घरी आला असता त्याला घराचे कुलुप व कोंडा तुटले दिसले व लोखंडी सलाक (डाय) पडलेली दिसली. सदर घटना मुलाने फिर्यादिला फोनद्वारे सांगीतली व घरी आलमारी पाहिली असता चोरी झाल्याचे सांगीतले. फिर्यादी हीने घरी जावुन पाहणी केली असता सोन्याचे दागीने एकुण ७३ ग्राम वजनाचे किमती २,९२,००० /- रू. चा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोराने घराचा कुलुप कोंडा तोडुन घरात दिवसा प्रवेश करून चोरून नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे देवरी येथे अप क्र. ५४ / २०२३ कलम ४५४, ३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि. आनंदराव घाडगे, पोस्टे. देवरी, हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share