शंभर केंद्रावरुन 18224 विद्यार्थी देणार परीक्षा

गोंदिया ◼️राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10 वीची परीक्षा आज, 2 मार्चपासून सुरू होत आहे. जिल्हा शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यात दहावीसाठी 100 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवरून 18224 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी मिळून चार भरारी पथके तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मंडळाचे वेगळे पथक राहणार आहे. संवेदनशिल परीक्षा केंद्रावर महसूल अधिकारी नियुक्त केले जातील. शक्यतोवर अशा केंद्रांचे चित्रीकरणही करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक भरारी पथक व प्रत्येक केंद्रावर पूर्ण वेळ बैठे पथक राहणार आहे.

परीक्षादरम्यान होणार्‍या गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगीतले जाते. जिल्ह्यात दहावीसाठी 100 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. यात गोंदिया तालुक्यात 31 केंद्र, आमगाव 10, सालेकसा 6, देवरी 9, अर्जुनी मोर 10, सडक अर्जुनी 9, गोरेगाव 10 व तिरोडा तालुक्यात 15 परीक्षा केंद्र आहेत. या केंद्रांवरून 18224 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दरम्यान, परीक्षा पारर्दर्शी, भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी सर्व घटकांनी दक्ष रहावे, सर्व मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर योग्य नियोजन करून परीक्षा कॉपीमुक्त करण्याचे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाशिकारी कादर शेख यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share