३ कोटी ५० लक्ष नळयोजनेचा भूमिपूजन थाटात, भ्रष्टाचारमुक्त काम करण्याची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

◼️सामान्य नागरिकाची भ्रष्टाचारमुक्त काम करण्याची सोशल मिडिया वर विनंती

देवरी ◼️तालुक्यातील गट ग्राम पंचायत गोटाबोडी अंतर्गत ग्राम धोबीसराड, आवरीटोला, गोटाबोडी तसेच भागी या गावात हर घर नल योजना म्हणजेच जल जीवन मिशन अंतर्गत ३ कोटी ५० लक्ष रुपयाचा नळ योजनेचा भूमिपूजन सोहळा २५ फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटात पार पडला. या भुमीपूजन सोहळ्याच्या शेयर केलेल्या फोटोस वर नेटकाऱ्याने केलेल्या भावनिक पोस्टची परिसरात चर्चा सुरु आहे.

ग्रामीण भागात पाण्याची भटकंती होऊ नये म्हणून, पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून गोंदिया जिल्हा परिषद पाणीपुरवठा च्या पिण्याच्या माध्यमातून हर घर नल योजना, जल जीवन मिशन अंतर्गत ग्रा.प. गोटाबोडी अंतर्गत नळ योजनेचे भूमिपूजन जि. प. महिला व बालकल्याण सभापती सौ. सविताताई पुराम यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला माजी आमदार संजय पुराम, पं.स. सभापती सौ. अंबिकाताई बंजार, उपसभापती अनिल बिसेन, कल्पनाताई वालोदे, पारस कटकवार, सरपंच मनोहर राऊत, उपसरपंच दीपक बावनथडे, नितेश वालोदे, ग्राम विस्तार अधिकारी पी. एम. देशमुख तसेच गावकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share