गोंदिया: पशुसंवर्धन विभागासाठी ठाकरेच मुख्यमंत्री?

गोंदिया ◼️राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन होऊन सात महिने झाले. आजही तत्कालीन शासनाच्या अनेक जाहिरातींवर तत्कालीन मुख्यमंत्री, संबंधित मंत्र्यांचे फोटो पहावयास मिळते. असाच प्रकार गोंदिया जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या मोबाईल व्हॅनवर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चित्र पहावयास मिळते. सात महिने लोटूनही संबंधित विभागाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे चित्र काढण्याचा विसर पडला की काय? असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन महिने लोटले. मात्र, गोंदिया जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला या सत्तांतराची बहुदा माहिती नसावी! कारण, या विभागाच्या फिरता दवाखाना वाहनावर आजही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असल्याचे माहिती जाहिरात फलकावर दिसते आहे. गोंदिया जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग अद्ययावत कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share