अवैद्य गांजा बाळगणार्‍या वर धडक कारवाही

डॉ. सुजित टेटे

देवरी,१९:-
विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात दिनांक 18 10 2020 रोजी अतुल कुलकर्णी (भापोसे) अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी कर्तव्याच्या ठिकाणी हजर असताना मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कदम ठाणेदार पोलीस स्टेशन देवरी यांना गोपनीय सूत्राकडून खात्रीशीर माहिती मिळाली की आज रोजी पोलिस ठाणे देवरी हद्दीत मौजा कोयलारी गावात एक इसम सर्रासपणे अवैधरित्या गांजा बाळगून विक्री करीत आहे असे मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि अजित कदम पोलीस स्टेशन देवरी, सपोनि विजय कुमार धुमाळ वाचक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय देवरी पोहवा /566 कंगाली, पोहवा/1354 राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय देवरी, पोना/1260 देसाई, पोना/1648 बोपचे पोलीस स्टेशन देवरी, यांना सदर ठिकाणी रवाना करून मिळालेल्या माहितीनुसार कोईराली गावातील हिरालाल तुकाराम मेश्राम 50 वर्ष यांचे घरी जाऊन घरासमोरील डाव्या बाजूला धानाच्या पिकात एका कोपऱ्यात पिवळ्या प्लास्टिक मध्ये सुतळीने गुंडाळलेली पोतळी मिळून आली. पंचांनी सदर पोतळी बांधी बाहेर काढून सोडून पाहिली असता त्यात वाढलेला गांजा सदृश्य हिरवट काळपट रंगाच्या उग्र वासाच्या कांड्या पत्ते व चुरा असलेला किंचित नरमपणा असलेला पदार्थ मिळून आला त्याची वास घेऊन खात्री झाल्याने मापारी कडून प्लास्टिक सह पिशवी चे वजन केले असता त्यात 2.540 किलोग्राम अंदाजे सुमारे 20000 रुपये चा मुद्देमाल मिळून आला तो सविस्तर जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आला असून आरोपी हिरालाल तुकाराम मेश्राम 50 वर्षे कोयलारी सडक-अर्जुनी यास ताब्यात घेण्यात आले.
सदर प्रकरणी सपोनी विजयकुमार धुमाळ वाचक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय देवरी यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्रमांक 228/2020 कलम 20( 2)b, कलम 21b, 22b, एन डी पी एस कायदा 1885 अन्वये आरोपी हिरालाल तुकाराम मेश्राम वय 50 वर्ष या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास स. पोलीस निरीक्षक अजित कदम पोलीस स्टेशन देवरी करीत आहेत

Print Friendly, PDF & Email
Share