कचारगड यात्रेनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल, आमगाव देवरी रस्त्यावर वाढणार रहदारी

सालेकसा : कचारगड यात्रेनिमित्त आमगाव – सालेकसा – डोंगरगढ (छ.ग.) या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांच्या जीवितास धोका होवू नये याकरिता आमगाव – सालेकसा – डोंगरगढ (छ.ग.) या मार्गाने ये-जा करणारी अवजड वाहने (एस.टी. बसेस, टप्पा वाहतूकीचा परवाना असलेली खासगी प्रवाशी वाहने, अ‍ॅम्बुलन्स, स्कुल बसेस, अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने, शासकीय मालकीची वाहने वगळून) यांच्या आवागमनास 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 ते 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजतापर्यंत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी तात्पुरते मनाई आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाणे हद्दीत कचारगड (धनेगांव) येथे 3 ते 7 फेब्रुवारीपर्यंत ‘महाकाली कंकाली कोपरलिंगा’ यात्रा होणार आहे. सदर यात्रेमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात. सदर ठिकाणी भाविकांची व त्यांचे वाहनांची प्रचंड गर्दी होत असते. आमगाव – सालेकसा – डोंगरगढ (छ.ग.) या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे अवजड वाहनांमुळे यात्रेतील लोकांची गैरसोय होऊन गंभीर स्वरुपाचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यानुसार सदर यात्रेदरम्यान सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांच्या जीवितास धोका होवू नये याकरिता आमगाव – सालेकसा – डोंगरगढ (छ.ग.) या मार्गाने ये-जा करणारी अवजड वाहनांच्या आवागमनास 3 फेब्रुवारी सकाळी 5 ते 7 फेब्रुवारी रोजी 7 वाजतापर्यंत तात्पुरते मनाई आदेश जारी करण्यात येत आहे. उपरोक्त नमूद कालावधीत मनाई करण्यात आलेल्या अवजड वाहनांना आमगाव देवरी – डोंगरगढ (छ.ग.) या पर्यायी मार्गाने आवागमन करण्याचे आदेश जारी करण्यात येत आहे. उपरोक्त आदेशाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग, गोंदिया यांनी प्रभारी अधिकारी, पो.स्टे. सालेकसा, गोंदिया यांच्या मदतीने आवश्यक त्या ठिकाणी सूचनात्मक वाहतूक चिन्हे, बोर्ड लावून घ्यावेत यावेत व याबाबत व्यापक प्रसिद्धी जारी करण्यात यावी, सदरची अधिसूचना 3 फेब्रुवारीपासून अंमलात येईल.

Print Friendly, PDF & Email
Share