“दिव्यांग व्यक्तीस दिले जीवनदान” सी-60 मलखांबे पथक, नवेगाव बांधची विशेष उल्लेखनीय कामगिरी

नवेगाव बांध◼️ 74 व्याप्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील संवेदनशील नक्षलग्रस्त भागात काहीही विपरीत अप्रिय घटना घडू नये याकरिता नक्षल प्रभावित भागातील गडचिरोली व छत्तीसगड च्या घनदाट जंगल व्याप्त सीमा भागात नक्षल विरोधी अभियान राबविण्या बाबत मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री.निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. अशोक बनकर, यांनी आदेशित केले होते.

या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी श्री.संकेत देवळेकर, यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली सी-60 मलखांबे पथक,नवेगावबांध मधील पो.अधिकारी व पो. अंमलदार नागनडोह जंगल भागात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना नागनडोह च्या घनदाट जंगलात सी-60 मलखांबे पथक यांचे सर्च ऑपरेशन राबवित असताना जवळ पास तीन ते चार दिवसा पासून अन्न पाण्याशिवाय अशक्त पणाने झोपून असलेला एक दिव्यांग व्यक्ती मिळून आला, मिळून आलेल्या दिव्यांग व्यक्तीस प्रथम नक्षल संदर्भाने SOP प्रमाणे सर्व चौकशी व निरीक्षण करून त्यास बोलण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या पोटात काहीही नसल्याने तो बोलू शकत नव्हता. त्यामुळे सदर दीव्यांग इसमास सर्वप्रथम नाष्टा व जेवण देऊन त्यास बरं वाटल्यावर विश्वासात घेऊन विचारपुस व चौकशी केली असता त्यांनी बिजेपार बाबत बडबड केली. तेव्हा सी-60 पथका तील सुट्टीवरील पोलीस अंमलदार पो. ना. / 1644 धारगावे व पो.हवा./ 1100 ताराम यांना बांबू तोड कामगार बनून जंगलात बोलाऊन घेऊन सदर दिव्यांग व्यक्तीची परिपूर्ण माहिती प्राप्त करण्यात आली. दिव्यांग व्यक्ती चा नातेवाईक त्याचा पुतण्या नामे- कोमल घरडे यास संपर्क साधून दिव्यांग व्यक्तीस त्याच्या स्वाधीन करण्यात आले. सदर दिव्यांग व्यक्ती चे नाव. भिमराव घरडे रा. कोटरा (बीजेपार) ता. सालेकसा असे असून सदर बाबत सालेकसा येथे गुम बाबत नोंद असल्याची माहिती प्राप्त झाले वरून त्यास त्याचे मुळगावी कोटरा (बीजेपार) ता. सालेकसा येथे पाठविण्यात आले आहे. येथे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सदर दिव्यांग व्यक्ती हा नागनडोह सारख्या जंगल व्याप्त भागात अन्न-पाण्याशिवाय अशक्त स्थितीत पथकास मिळून आल्याने त्यास पथकाने वेळेवर जेवण पाणी देवून, त्यास त्याचे परिवाराचे सुपुर्द करुन त्यास नवे जीवनदान च दिले आहे. मा.पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री.अशोक बनकर यांनी विशेष उललेखनीय कामगीरी करणाऱ्या सी.60 मलखांबे पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री.चंद्रशेखर मोरखंडे आणि सी.60 मलखांबे पथकातील सर्व पोलीस अंमलदार यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share