कुरखेडाः झाडीपट्टी रंगभूमीचे डॉ. परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली: ७४ व्या प्रजासत्ताक दिनापूर्वी, केंद्र सरकारकडून बुधवारी (दि. २५) भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार व प्रतिष्ठित पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील झाडीपट्टी रंगभुमीचे डॉ. परशुराम खुणे यांना पद्मश्री परस्कार जाहीर करण्यात आला आहे. जवळपास २५ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कुरखेडा तालुक्याच्या गुरनुली गावातील डॉ. परशुराम खुणे गेल्या ४० वर्षांपासून झाडीपट्टीच्या रंगभूमीवर रसिकप्रिय विनोदी नट आहेत. आजपर्यंत झाडीपट्टीच्या रंगभूमीवर आठशेवर नाटकातून विविध भूमिका साकारल्या आहेत. विशेषत: ‘झाडीपट्टीतील दादा कोंडके’ अशीही त्यांची ख्याती आहे. डॉ. खुणे हे अनेक वर्षे गुरनुलीचे सरपंच होते. तसेच ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share