जिप शाळेच्या चार वर्ग खोल्या जळून खाक

आमगाव◼️स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीतील पोषण आहार शिजविणार्‍या स्वयंपाकगृहासह चार वर्ग खोल्या जळून खाक झाल्या. ही घटना 24 जानेवारी रोजी 9.30 वाजता घडली. या घटनेत जीवितहाणी झाली नसली तरी शाळेचे मोठे नुकसान झाले. नेहमीच प्रमाणे सायंकाळी शाळा बंद करुन शिक्षक व कर्मचारी निघून गेले.

दरम्यान रात्री 9.30 वाजताच्या सुमारास शाळेतून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली असता स्वयंपाकगृहाला आग लागल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती अग्निशामक विभाग व पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत स्वयंपाकगृहाच्या आगीची झळ शेजारील चार वर्ग खोल्यांनाही बसून त्यांनाही आग झाली. आग विझविण्यात यश येईपर्यंत स्वयंपाकगृहासह चारही वर्ग खोल्या जळून खाक झाल्या. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने यात जीवितहानी झाली नसली तरी शाळेचे मोठे नुकसान झाले. चार वर्ग खोल्या जाळून खाक झाल्याने विद्यार्थ्यांना आता कुठे शिकवावे आसा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. मात्र नेमकी आग कशी लागली, याचे कारण अस्पष्ट आहे.

Print Friendly, PDF & Email
Share