केशोरी पोलीस स्टेशन येथे नक्षलग्रस्त भागातील नवतरूणांसोबत “राष्ट्रीय मतदार दिवस” मोठ्या उत्साहात साजरा

Deori◼️पोलीस स्टेशन केशोरी येथे राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचीत्य साधून नक्षलग्रस्त आदिवासी भागातील नवतरूण युवक-युवती यांच्यासोबत राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ देवून साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला नक्षलग्रस्त भागातील सुमारे २०० नवतरूण उपस्थित होते. उपस्थीत नवयुवक-युवती यांना मतदार यादीत तरुणांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार प्रक्रियेत सहभाग वाढवावा. तसेच लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. लोकशाही अधिक बळकट करावी. जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून इतर नवतरूणांना सुध्दा मतदार नोंदणी करण्यास प्रोत्साहित करावे. असे आवाहन केशोरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री सोमनाथ कदम यांनी केले.

“आम्ही भारताचे नागरीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” या शपथेचे वाचन मा. ठाणेदार सोमनाथ कदम साहेब यांनी उपस्थित नवतरूण-तरूणी पोलीस स्टेशन केशोरीचे पोलीस अंमलदार तसेच भा.रा.ब. चे अंमलदार, स्पर्धा परिक्षा, भरती पुर्व प्रशिक्षणार्थी व समर्थ आदिवासी आश्रम शाळा केशोरी, विदर्भ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व विदयार्थी यांचेसोबत केले.

सदर राष्ट्रीय मतदार दिवस मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया यांचे निर्देशाप्रमाणे मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री निखिल पिंगळे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी श्री अशोक बनकर साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री संकेत देवळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन केशोरीचे ठाणेदार श्री. सोमनाथ कदम, सपोनि शेख, पोलीस हवालदार सुशिल रामटेके, दिपक खोटेले, पोलीस अंमलदार संतोष केशोरी पोलीस ठाणेचे अंमलदार यांनी पार पाडले.

Print Friendly, PDF & Email
Share