जमिनीच्या वादावरून हत्या

गोंदियाः जमिनीच्या वादावरून 55 वर्षीय इसमावार आरोपीने ट्रॅक्टर अंगावर चढवून व कुर्‍हाडीने वार करून हत्या केल्याची घटना 17 जानेवारी रोजी देवरी तालुक्यातील शेंडा कोयलारी येथे संध्याकाळी घडीली. हिरालाल मेश्राम रा. शेंडा कोयलारी (प्रधानटोला) असे मृतकाचे नाव आहे.

माहितीनुसार मृतक हिरालाल व ताराचंद पुस्तोडे यांच्यात जमिनीवरून नेहमी वाद होत असत. त्यातच मंगळवारी हिरालाल मेश्राम यांच्याशी ताराचंद पुस्तोडे व त्याच्या पुतन्या विनोद पुस्तोडे यांनी जमिनीच्या कारणावरून चांगलाच वाद घातला. वाद एवढा विकोपाला गेला की, तारांचद व विनोद पुस्तोडे यांनी हिरालालच्या आगांवर ट्रक्टर चढवत डोक्यावर कुर्‍हाडीने वार केला. यात हिरालाल जागीच गतप्राण झाला. घटनेत हिरालालचा मुलगाही जखमी झाला. त्याला देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती देवरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व हिरालालचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी देवरी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंद करून अटक केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share