पत्रकार हा संविधानाचा चौथा आधार स्तंभ… बबलू कटरे


▪️अर्धनारेश्वरालय येथे पत्रकार दिन कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न
▪️पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांनी दुमदुमले मंच…!
▪️ सालेकसा तालुका पत्रकार संघाचा पुढाकार


तालुका प्रतिनिधी

सालेकसा:7 समाजाच्या ख-या व्यथा अन् गाथा मांडून त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न पत्रकार करीत असतो. त्याचबरोबर समाज मूल्यांना जोपासत स्वतःच्या जीवाची परवा न करता पत्रकार हा जनहितार्थ रणवादळासारखा लढत असतो. व संविधानाचा खरा चौथा आधारस्तंभ म्हणून आपली खरी भूमिका बजावीत असतो. पत्रकारांनी त्यांच्या सामाजिक कार्यामुळे संविधान जिवंत आहे. असे प्रतिपादन ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी केले आहे. ते सालेकसा पत्रकार संघ सालेकसा च्या वतीने श्री अर्धनारेश्वरालय हलबीटोला येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकार दिवस व प्रबोधनात्मक कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी स्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत वनराईच्या संगोपनासाठी आलेल्या अतिथींचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी माजी बालकल्याण सभापती सौ. लता दोनोडे या होत्या तर उद्घाटक म्हणून माजी बालकल्याण सभापती सौ. सविताताई पुराम प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत इलमकर, बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष देवरी संदिप भाटिया, बलिराम कोटवार, पत्रकार चंद्रकुमार बहेकार, गुणवंत बिसेन, तुकाराम बोहरे, कुलतारसिंग भाटिया, ब्रजभूषण बैस, ओबीसी कृती समिती तालुकाध्यक्ष मनोज डोये, गोटूल आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा वंदनाताई मेश्राम, वंदनाताई काळे, टिनाताई चुटे, गीताताई लिल्हारे, अविनाश टेंभरे, परसरामभाऊ फुंडे, सरपंच गिरोला देवरामभाऊ चुटे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रकार हा समाजाचा खरा आरसा असून समाजाच्या जडणघडणेत त्याची महत्त्वाची भूमिका असते असे वक्तव्य लता दोनोडे यांनी केले. व्यवस्थेला योग्य दिशा दाखविण्याचे मार्गदर्शक कार्य पत्रकारांचे असते आणि ते त्यांनी अविरत करत राहावे उद्घाटक असतानावरून सविता पुराम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील युवक-युवतींसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलींच्या गटातून प्रथम पुजा बिसेन, द्वितीय सोनिया लिल्हारे, तृतीय पायल चुटे तर मुलांच्या गटातून प्रथम उमेश बहेकार, द्वितीय दामेलाल दशरिया, तृतीय अंतिम खोटेले यांनी क्रमांक मिळविला असून सदर स्पर्धकांचे अतिथींच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन पुरस्कृत करण्यात आले. तसेच तालुक्यातून बाराव्या वर्गात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या कु. तुलेस्वरी कावडे त्याचबरोबर कोरोना काळात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या नितेश वाघाडे यांचेही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. चव्हाण स्पोर्ट्स अकॅडमी सालेकसा मार्फत स्वतःचे संरक्षण स्वतः कसे करायचे हे सांगणारे तायकांडोचे डेमो यावेळी सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पटले टायपिंग व सार्वजनिक साक्षरता वाचनालय सालेकसा, डॉ. शैलेश भसे निर्मल क्लिनिक, डॉ. बाबुसिंग राठोड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुनाराम मेहर यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन पाथोडे यांनी केले. उपस्थितांचे आभार राकेश रोकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित अग्रवाल, राहुल हटवार, नेपाल पटले, दिनेश मानकर, यशवंत शेंडे, प्रकाश टेंभरे, संजय बारसे, रवीकुमार सोनवाणे, बाजीराव तरोणे, किशोर वालदे, संजय उके, कृष्णा मेंढे, रोहिणी शेंडे, भाग्यश्री नाईक, उमा नाईक, यांनी परिश्रम घेतले


मॅरेथॉन स्पर्धेत युवकयुवतींनी मोठ्या प्रमाणात घेतला सहभाग
सालेकसा पत्रकार संघ च्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील 14 ते 25 वयोगटातील युवक-युवतींसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. तालुक्‍यातील 150 युवक-युवतींनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला असून या प्रसंगी सालेकसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद बघेले यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचे सुभारंभ केले होते.

Print Friendly, PDF & Email
Share