विविध सामाजिकहितार्थ पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सचिन भांडारकर यांचा राजुरा येथे सत्कार

देवरी: चंद्रपूर जिल्हातील राजुरा येथे संपन्न झालेल्या पहिल्या विदर्भ स्तरिय पर्यावरण संमेलनामध्ये नेफडो संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक हितार्थ पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देवरी येथील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था चे गोंदिया जिल्हाध्यक्ष सचिन भांडारकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी मुख्यतः माननीय नामदार श्री. सुधीरभाऊ मुनगट्टीवार मंत्री वने , माननीय श्री सुयोग धस संस्थापक नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था , माननीय श्री हंसराज अहिर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग , मा.जयराज नायर ज्येस्ट अभिनेते तसेच आदी मान्यवर हे होते. या संमेलनात पर्यावरण व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share