देवरी येथे ब्लॉसम महोत्सव 2023 चे थाटात आयोजन

देवरी : आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात दर्जेदार, कृतीयुक्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये 13 वे ब्लॉसम महोत्सव 2023 चे थाटात पार पडले.

सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी देवरीचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, संस्थापिका अंकिता रूईया, नकुल रूईया, संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल, प्राचार्य डॉ. सुजित टेटे आदी मंचावर उपस्थित होते.

3 दिवशीय महोत्सवामध्ये विज्ञान प्रदर्शन, गणित, मराठी, हिंदी, सामाजिक शास्त्र, कायानुभव आदी प्रदर्शन ठेवण्यात आले होते. विविध लोकनृत्य आणि सामाजिक, सांस्कृतिक संदेश देणारे नृत्य प्रदर्शन साजरे करण्यात आले.

विशेष म्हणजे या मंचावर ब्लॉसम सुपर मॉम आणि सुपर डॅड या स्पधेर्चे आयोजन करण्यात आलेले होते यामध्ये पालकांनी आपली नृत्यकला प्रदर्शित केली आणि सर्वांचे मन मोहून घेतले. यामध्ये सरिता थोटे प्रथम, कुमुद देसकर द्वितीय, राखी बावरीया,रजनी मेश्राम, गुरप्रीत भाटिया, तनुजा भेलावे, सुपर डॅड मध्ये सुभाष लांजेवार यांनी क्रमांक पटकावला. सदर महोत्सवाचे निरीक्षण ऍडो. मेघा ठाकूर आणि विद्या धुर्वे यांनी केला. सर्व विजेत्यांचे प्राचार्य डॉ सुजित टेटे सह सर्वमान्यवरांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून सचिन धात्रक, प्रितामसिंह भाटिया, अंकिता रूईया, नकुल रूईया प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मोहुर्ले, सरिता थोटे यांनी केले असून शाळेतील सर्व शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

Print Friendly, PDF & Email
Share