रानडुकराची शिकार करणारे एफडीसीएमच्या जाळ्यात

सडक अर्जुनी◼️तालुक्यातील जांभळी वनपरिक्षेत्रात 15 जानेवारी रोजी रानडुक्कराची शिकार (Boar hunters) करुन त्याचे मांस बाळगणार्‍या पाच आरोपींना एफडीसीएमने अटक केली. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून अटक केलेल्या आरोपींजवळून 2 किलो मांस जप्त करण्यात आले.

जांभळी वनपरिक्षेत्रात रानडुकराची शिकार (Boar hunters) करुन मांस खाण्यासाठी चारचाकी वाहनातून घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती एफडीसीएमला मिळाली. या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्राधिकारी, आमगावचे फिरते पथक व जांभळीचे वनधिकार्‍यांनी उमरझरी ते जांभळी दरम्यान नाकाबंदी केली. यादरम्यान एक चारचाकी वाहन संशयास्पद आढळल्याने त्याची तपासणी केली असता वाहनाता रानडुकराची शिकार करुन त्याचे 2 किलो मांस आढळले.

याप्रकरणी अंकोश रहांगडाले, प्रविण बिजेवार, अशोक इळपाते, विशाल कोचे, भिवराम मंडारे यांना अटक करण्यात आली असून काशीराम सय्याम, श्रीचंद उईके फरार झाले. आरोपींवर भारतीय वन्यजीव अधिनियम 1973 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई जांभळी वनपरिक्षेत्राचे अधिकारी एम. एन. नंदेश्वर, वनपाल आर. एन. लांबट, डी. ए. सूर्यवंशी, एन. जी. शिनगरापुतळे, फिरत्या पथकातील वनरक्षक एम. टी. घासले, आर. टी. गौतम, एस. टी. बिसेन, डी. एस. मिसे यांनी केली. पुढील तपास आमगाव फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राचे अधिकारी एम. एस. बागळे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share